पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जो बायडेन यांच्या पत्नीला ७.५ कॅरेटचा हिरा भेट
![Prime Minister Narendra Modi gifted a 7.5 carat diamond to Joe Biden's wife](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/PM-Narendra-Modi-780x470.jpg)
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दैऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून भेटवस्तू स्वीकारल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी यांना भारतातील महाराष्ट्रासहित १० राज्यांतील महत्वाच्या काही खास वस्तू भेट स्वरूपात दिल्या. त्यात मोदींनी दिला बायडेन यांना एक मौल्यवान हिराही भेट दिला आहे.
हेही वाचा – भारतीय लोकांपेक्षा जपानी लोक जास्त का जगतात?
![PM Modi's gifts to US First Lady Jill Biden, President Biden; all you need to know, pm modis gift to us first lady](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/22-06-2023/1200-900-18814861-790-18814861-1687399040332.jpg)
https://twitter.com/PMOIndia/status/1671771649841184768
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा हिरा भेट दिला आहे. प्रगत तंत्रज्ञानाने बनवलेला हा खास हिरा प्रतिकॅरेट फक्त ०.०२८ ग्रॅम कार्बन उत्सर्जित करतो. हा हिरा पृथ्वीवरून निघणाऱ्या रासायनिक आणि ऑप्टिकल घटकांचे गुण दर्शवतो. जो पर्यावरणास अनुकूलही आहे. या हिऱ्याच्या निर्मितीसाी सौर व पवनऊर्जा यांसारख्या संसाधनांचा वापर करण्यात आला आहे.