breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

देशातला पहिला निकाल समोर, काँग्रेसच्या उमेदवाराची बाजी

Lok Sabha Election Results 2024 | देशातील पहिला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कथित सेक्स स्कँडलमधील आरोपी असलेल्या जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव झाला आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांचा काँग्रेसच्या श्रेयस पटेल यांनी पराभव केला आहे. हासन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने २५ वर्षांनंतर विजय मिळवला आहे.

दुपारी १२.४५ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार प्रज्वल रेवण्णा यास ४ लाख ९१ हजार ०६७ मत मिळाली आहेत. तर, काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल यांना ५ लाख १४ हजार ४८५ मतं मिळाली आहे. त्यामुळे, सध्या २३,४१८ मतांसह पटेल आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार प्रज्ज्वल रेवण्णाचा पराभव झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा    –    लोकसभा निकाल : आताच्या घडीची ताजी आकडेवारी समोर; जाणून घ्या जनतेच्या मनात नेमके काय?

दरम्यान,बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रज्वल रेवण्णा पोहोचताच त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीला इंटरपोलनं गुरुवारी प्रज्वल रेवण्णाच्या भारतात येण्यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर बंगळुरु पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाच्या अटकेसाठी पूर्वतयारी करुन ठरली होती. बंगळुरु पोलिसांच्या एसआयटीनं प्रज्वल रेवण्णा भारतात पोहोचताच अटकेची कारवाई केली. सध्या प्रज्वल रेवण्णा बंगळुरु पोलिसांच्या कोठडीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button