‘अजित पवार एक ना एक दिवस मुख्यमंत्री होतीलच’; प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान
![Praful Patel said that Ajit Pawar will become Chief Minister one day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/ajit-pawar-and-Praful-Patel--780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील असं राष्ट्रवादीतील अनेक नेते बोलत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील ते मुख्यमंत्री होतील असं सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होणार का? असा सवाल अजित पवार गटाचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारला. यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील. परंतु आता ती जागा रिकामी नाही तर मग यावर चर्चा काशासाठी करताय? असा सवाल केला.
हेही वाचा – भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार? ‘या’ दिवशी होणार सामना?
आजच्या घडीला अजित पवार हे नक्कीच महाराष्ट्रातील एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आमच्या पक्षाचं नेतृत्व करत आले आहेत. नेतृत्व ही काही नवीन गोष्ट नाही. कधी ना कधी ते मुख्यमंत्री होतील. ठीक आहे! काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या, उद्या नाहीतर परवा संधी नक्कीच मिळत असते. अनेक लोकांना ती संधी मिळाली आहे. त्यामुळे अजित पवारही आज नाहीतर उद्या नक्कीच मुख्यमंत्री होतील. उद्या म्हणजे उद्या नव्हे, कधीही, पुढच्या काळात कधी ना कधी त्यांना तशी संधी मिळेल. आम्ही त्या दिशेने काम करू, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.