breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत राजकीय भूकंप : शरद पवारांचा अजित पवारांना ‘जोर का झटका’! 

 शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह १६ माजी नगरसेवक प्रवेश करणार : शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या उपस्थितीमध्ये निर्णायक बैठक 

  • येत्या ५ जुलैरोजी प्रवेशाचा मुहूर्त; शहरातील राजकीय समीकरण बदणार

पुणे :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad)  अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार (Sharad Pawar)  सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत.  पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 16 नगरसेवकांनी  काल मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली आहे. तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande)  हे  शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या उपस्थितीमध्ये निर्णायक बैठक झाली असून, येत्या ५ जुलैरोजी पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 16 नगरसेवकांनी मोदीबागेत शरद पवाराची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आणि माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष व पिंपरी-चिंचवड निरीक्षक प्रकाश म्हस्के उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता समस्त महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकचे वेध लागले आहे. राजकीय पक्षांनीदेखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली आहे. दुसरीकडे नेतेमंडळींना आपल्या मतदारसंघात लोकांशी गाठीभेटी वाढवल्या आहेत. तर काही नेते तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहेत.  काही नेते आपली राजकीय सोय बघून पक्षबदल करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय घडामोडींनीही वेग आला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे.

भोसरी विधानसभेत ‘तुतारी’ निश्चित…

दरम्यान, अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. कारण, अजित गव्हाणे यांच्यासोबत विलास लांडे यांचा मुलगा माजी नगरसेवक विक्रांत लांडे बैठकीला उपस्थित होते. तसेच, लांडेंच्या सोबत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी नगरसेवकांसह 15 पदाधिकारी ही शरद पवारांच्या तालमीत परतण्याचे निश्चित झाले आहे. लोकसभेत शरद पवारांचा चाललेला करिश्मा पाहून विलास लांडे घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र भोसरी विधानसभा विलास लांडे आणि त्यांचे नातेवाईक अजित गव्हाणे ही लढण्यास तीव्र इच्छुक आहेत. परंतु, महाविकास आघाडीमध्ये या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. परंतु, लांडे आणि गव्हाणे यांचा शरद पवार गटातील संभाव्य प्रवेश पाहाता ही जागा ‘तुतारी’वर लढण्याचे निश्चित झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे तीव्र इच्छुक सुलभा उबाळे आणि धनंजय आल्हाट यांची भूमिका काय? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button