breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जितेंद्र आव्हाडांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

हर हर महादेव चित्रपटात (har har mahadev movie) चुकीचा इतिहास दाखविण्यात आला असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra avhad) यांनी केला. ठाण्यातील (thane) विवियाना मॉल मध्ये चित्रपटाचा शो सुरु असताना जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आणि हाणामारी केली त्यावरुनच आता वादंग सुद्धा निर्माण झाला. राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माध्यांना प्रतिक्रिया दिली आहे.

‘जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी जी कायदेशीर कारवाई केली ती कायदेशीर आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही किंवा हे कोणी मुद्दामहूनही केलेलं नाही’. अशी प्रतिक्रया मुख्यमंत्री शिंदे (cm eknath shinde) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेवर दिली.

त्याचसोबत सध्या भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) सुरु आहे त्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे काल सहभागी झाले होते. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत म्हणले की ‘राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे (aditya thackeray) या दोन्ही नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे’. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘संजय राऊत मोठे नेते आहेत’ असं म्हणत उत्तर देण्याचे टाळले.

त्याचप्रमाणे शिंदे गटातील नेते मागील काही दिवसांपासून चुकीचे वक्तव्य करत आहेत. त्यावर राष्ट्रवादीकडून आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘शिंदे – फडणवीस सरकार म्हणेजच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार राज्यात आहे आणि ते कामाला प्राधान्य देत आहे. अडीच वर्षांत जी विकास कामे रखडली होती त्यांना मागील तीन ते चार महिन्यांमध्ये आम्ही चालना देण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा यालाच आम्ही प्राधान्य देत आहोत’.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यांमध्ये जात आहेत त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘आरोप करणारे करतच राहतात. पण कोणताही प्रकल्प लगेचच राज्याबाहेर जात नाही. आमचं सरकार विकासाला आणि उद्योगाला चालना देणारे सरकार आहे. येत्या काळात काही मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहेत असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी दिले आहे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत आणि येत्या काळात ते सर्वांनच दिसेल’. असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button