breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

मार्केटयार्ड परिसरात ‘विपूल’ बंगल्यावर पोलिसांचा छापा; जुगार खेळाताना आढळले नामांकित अन् राजकीय व्यक्ती

पुणे |

शहरात गुन्हेगारासोबतच जुगार खेळणाऱ्याची मुजोरी पाहिला मिळत असून, मार्केटयार्ड (Marketyard) येथे धक्कादायक प्रकार पोलिसांना अनुभवायला आला असून, उच्चभ्रू परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या जुगारावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनाच चक्क पहाटेपासून ताटकळत उभा रहावे लागले आहे. सरते शेवटी कुलूप तोडून पोलिसांनी या जुगारावर छापा टाकला आहे. यात मोठ्या प्रमाणात जुगार खेळणार्‍यांना पकडले असून, काही मिनीटांपुर्वी (म्हणजे आज दि. 29 मे 2021 रोजी) पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आहे.

मार्केटयार्ड येथील विद्यानगर भागात असलेल्या विपूल बंगल्यात ही कारवाई सूरु आहे. गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत काही नामांकित व्यक्ती आणि राजकीय व्यक्ती असल्याची माहिती आहे. तर मोठ्या प्रमाणात जुगार साहित्य आणि इतर मौल्यवान ऐवज मिळाला आहे. दरम्यान, पहाटे पासून पोलीस या बंगल्या खाली कारवाईसाठी थांबले होते. मात्र याला बाहेरून कुलूप होते. तर आतुनही बंद होते. पोलिसांनी सांगितल्यानंतर देखील आतुन दरवाजा उघडला जात नव्हता. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर काही तास पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाट पाहत थांबले होते. काही वेळापूर्वी येथे वरिष्ठ दाखल झाल्यानंतर आता कुलूप तोडून ही कारवाई करण्यात आली आहे. अद्याप कारवाई सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button