पंकजा मुंडेंचा आपल्या भाषणातुन बावनकुळेंना चिमटा; म्हणाल्या, काय मागायचं नाही
साहेबांचे नेते वाजपेयी आणि अडवाणी होते, तसेच माझे मोदी आणि शाह आहेत
मुंबई : मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचार सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेत्या पंकज्या मुंडे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातुन बावनकुळेंना चिमटे काढले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंकजाताईला विमानात घेऊन आले. याचा त्यांना पुढील दोन महिने त्रास होईल, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बावनकुळेंना चिमटा काढला आहे.
मी काही कधी कुणाला त्रास देत नाही, मी जर ठरवलं त्रास द्यायचं, तर तुम्हाला रोज देन-चार हजार लोक भेटतील. हे बांधून ठेवलंय, मी त्यांना नजरेने बांधले आहे. काय मागायचं नाही, काय म्हणाचं नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीडच्या सभेत मला कळलं नाही, की हे सुतकाला आले की मेळाव्याला. रोज मला असे मेसेज की मी जीव द्यावा. गोपीनाथ मुंडे साहेबांचे नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी होते. तसेच माझे नेते नरेंद्र मोदी आणि शाह आहेत, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.