‘चिंचवडमधून आता नाना काटे यंदा आमदार होणारच’; युवा नेते पार्थ पवार
माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम
![Parth Pawar said that Nana Kate will become MLA from Chinchwad this year](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Parth-Pawar-and-Nana-Kate-780x470.jpg)
पिंपरी | चिंचवडमधून आम्ही विठ्ठल उर्फ नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नाना आमदार झाले पाहिजे अशी येथील नागरिक, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे असे राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार म्हणाले. यासाठी आम्ही चिंचवड मतदार संघात मोर्चेबांधणी केली आहे असेही पवार म्हणाले.
नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पार्थ पवार बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग आप्पा बारणे , माजी महापौर संजोग वाघिरे, नितीन आप्पा काळजे, अखिल भारतीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा, माजी उपमहापौर प्रभाकर वाघिरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले (उबाठा) , युवक शहर अध्यक्ष शेखर काटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष विद्यार्थी धीरज शर्मा, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक श्रीधर बापू वाल्हेकर, प्रवीण भालेकर, राजेंद्र जगताप, सुषमा तनपुरे, संतोष कोकणे, विनोद नढे, जितेंद्र ननावरे, हरीश तापकीर, बाबुराव शितोळे, मयूर कलाटे, राहुल भोसले, सीमा सावळे, नारायण बहिरवाडे, मोरेश्वर भोंडवे, माउली सूर्यवंशी तसेच रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका, फजल शेख, कांतीलाल गुजर, दिलीप आप्पा काळे, नवनाथ नढे, वर्षा जगताप, शाम जगताप, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, विनायक रणसुंभे, इम्रान शेख, संदीप जाधव, सतीश दरेकर, राजेंद्र साळुंके, संतोष लांडगे आदी उपस्थित होते.
हेही वाचा – गाफील न राहता विधानसभा विजयासाठी आजपासूनच कामाला लागा; खासदार मेधा कुलकर्णी
चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत नाना काटे अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले. मात्र पराभूत झाल्यानंतरही मतदारसंघाकडे त्यांनी अतिशय बारकाईने लक्ष ठेवत काम केले आहे आणि करत आहेत. त्यांनी आमदार व्हावे अशी येथील नागरिकांची इच्छा आहे. यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी हे देखील नाना आमदार व्हावेत यासाठी प्रयत्न करणार आहेत . त्यामुळे यंदा नाना आमदार होणारच असे पार्थ पवार म्हणाले.
भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
वाढदिवसाच्या निमित्ताने शाम जगताप व तानाजी जवळकर याच्या वतीने महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम, निळु फुले सभागुह येथे घेण्यात आला. यानिमित्ताने आरोग्य सफाई कर्मचारी यांना रेन कोट, जेष्ठ नागरिकांना छत्री, शालेय विध्यार्थी यांना शालेय वस्तुचे वाटप करण्यात आले. बाळासाहेब पिल्लेवार व नाना काटे मित्र परिवार यांच्या वतिने नाना काटे यांच्या हस्ते औधं जिल्हा रूगणालय येथे रूग्णाना फळे व उपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले. सचिन वाल्हेकर याच्या वतीने वाल्हेकरवाडी चिंचवडेनगर व परिसरात मोफत आरोग्य व रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
रक्तदात्यांचा १० लाख रूपयाचा अपघाती विमा!
नगरसेविका शितल काटे व नाना काटे सोशल फाऊडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर, रहाटणी, थेरगाव, काळेवाडी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक रक्तदात्यास १० लाख रूपयाचा अपघाती विमा देण्यात आला.