breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘संसदेत कोल्हेंसारखं नेतृत्व असायलाच हवं’; शरद पवार

प्रधानमंत्री मोदी आणि त्यांचे सहकारी लोकशाहीवरील संकट

चाकण : हा देश लोकशाही देश आहे. जगातील श्रेष्ठ लोकशाही भारतात आहे. लोकशाहीची आस्था आणि औसुक्य जगाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी लोकशाहीवर संकट आणू पाहत आहेत; अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या चाकण येथील सभेत केली. यावेळी व्यवस्थेला बेधडक आव्हान देणारे डॉ. अमोल कोल्हे संसदेत हवेतच असं म्हटलं आहे

यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सचिन आहिर, कामगार नेते शशिकांत शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, खासदार ओम राजे निंबाळकर, आदित्य शिरोडकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश उपाध्यक्ष राजमाला बुट्टे पाटील, आमदार संजय जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड, राम कांडगे, जगन्नाथ शेवाळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, विजय शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, शिवाजी वर्पे, सुरेश भोर, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, हिरामण सातकर, विजय डोळस, अमोल पवार, देवदत्त निकम, बाबाजी काळे, माऊली कटके, मयूर दौंडकर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

हेही वाचा     –      ‘अब की बार जनता भाजपला तडीपार करणार’; आदित्य ठाकरे 

शरद पवार म्हणाले, येणाऱ्या सरकारकडे जगाचे लक्ष आहे. हा देश लोकशाही असलेला देश आहे. लोकशाहीवर मोदी आणि त्यांचे सहकारी संकट आणू पाहत आहेत. त्यांना घटना आणि संविधान बदलायचे आहे. यावेळी टीका व्हायला लागली त्यावेळी मोदी सांगू लागले आम्ही घटनेला हात लावणार नाही. घटना बदल्याण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन भाजप नेते करीत आहेत. त्यासाठी ४०० खासदार निवडून द्या. याचा अर्थ हा असा आहे कि तुमच्या आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा डाव त्यांनी तयार केला आहे. त्यापासून आपण सावध भूमिका घेतली नाही तर हिंदुस्थानची लोकशाही धोक्यात जाण्याची भीती पवार यांनी व्यक्त केली.

जवाहर नेहरू इंदिरा गांधीसह जे जे पंतप्रधान झाले; त्यांच्या सभा आम्ही ऐकल्या आहेत; मात्र त्यापेक्षा लाजिरवाणी भाषा पंतप्रधान मोदी करीत आहेत. मोदी राज्यात येतात आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर मोदी टीका करतात मात्र आमच्या अंगाला टीकेमुळे भोके पडणार नाहीत. ते या ठिकाणी नाही त्या गोष्टी सांगतात. नव्या पिढीचा नेता राहुल गांधी पायी सर्व देशात फिरला; लोकांशी संवाद साधला, त्यांची दुःख समजून घेतली; त्यांची मोदी टिंगल करत आहेत. पंडित नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांनी देशासाठी त्याग केला मात्र त्याची नोंद घेणे सोडा तर त्यांच्या बाबत वेडेवाकडे बोलले जात आहे. शेतमालाला रास्त किंमत मिळालीच पाहिजे, प्रत्येकाला काम मिळाले पाहिजे स्रियांचा सन्मान झाला पाहिजे त्यासाठी संसदेत डॉ. कोल्हे यांच्या सारखे नेतृत्व जायला हवे. असंही पवार यांनी म्हटलं आहे.

आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, देशाचे राज्याचे राजकारण भाजपने पूर्णपणे बिघडले आहे. भाजपने महाराष्ट्राचे जास्त नुकसान केले आहे. मतदारावर आणि मतदानावर आघात होतो कि काय अशी देशात परिस्थिती निर्माण झाली आहे देशाचे काय होणार अशी स्थिती आहे बिघडवलेले राजकारण आपल्याला सुधारायचे आहे. अशा वेळी योग्य प्रतिनिधी आपल्याला संसदेत पाठवायचे आहे. डॉ अमोल कोल्हे यांना लोकसभेत पुन्हा पाठविण्याची जबाबदारी आपली आहे. राज्य आणि देश पुढे न्यायचा आहे आपली जबाबदारी आहे आहे. आपले मत आदर्श लोकप्रतिनिधी डॉ. अमोल कोल्हे यांना देत आहोत ते थेट शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, सोनिया गांधी याना जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button