breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

#padalkarVSpawars: लक्ष्मण मानेंची पडळकरांवर खास शैलीत टीका

मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (24 जून) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केलेली आहे. मात्र ही टीका आता पडळकर यांना भोवणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत. पडळकरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेला आहे.

“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” अशा शब्दात पडळकरांनी पवारांवर टीका केली होती. गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली आहे. पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने आज (गुरुवारी सकाळी 10 वाजता) आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पडळकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

काय म्हणाले लक्ष्मण माने…

पडळकरांनी आपल्या कुवती प्रमाणे वागावे, उंटाच्या बुडक्याचा मुका घेऊ नये नाहीतर दात पडतात, पडळकरांचे पूर्ण जीवन आहे तेवढ पूर्ण सार्वजनिक राजकीय आयुष्य शरद पवारांच आहे. शरद पवार हे कधीच जातीयवादी वागले नाहीत, पडळकरांनी धनगरांच्या चळवळी केल्या मग ते जातीयवादी नाही का..?, पडळकर खरे तर RSS वाले आहेत मी जाहीर शब्दात निषेध करतो, अशी टीका लक्ष्मण माने यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button