breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘इच्छुकांचे मनसुबे उधळणार…’ अशी भूमिका नाही, ‘ते’ वृत्त खोटे : विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचा दावा

  • पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष बदलावरुन सोशल धुरळा
  • विद्यमान शहराध्यक्ष समर्थक – इच्छुंकांमध्ये राजकीय साठेमारी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्ष बदलासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे विध्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि इच्छुक समर्थकांमध्ये राजकीय साठेमारी पहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे,  विद्यमान शहराध्यक्ष वाघेरे-पाटील यांच्या कामाचे कौतूक करीत शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या ज्येष्ठ- नवोदितांचे मनसुबे उधळून लावणार, असा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी दिल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ‘शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांचे मनसुबे उधळून लावणार’ असा दावा मी केलाच नाही. प्रसारमाध्यमांकडून त्यांना हवा तसा अर्थ लावला जात आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी ‘महाईन्यूज.कॉम’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संघटनात्मक बदलाची चर्चा आहे.  माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, युवक कार्यकर्ते संदीप पवार आदी शहराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या कामाचे कौतूक केले आहे. तसेच, आगामी निवडणुका या वाघेरे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या जाव्यात, अशी भूमिका जाहीरपणे मांडली आहे.

***

पक्षातील पदांसाठी इच्छुक असणे गुन्हा आहे का?

पक्षात काम करीत असताना विविध पदांवर कार्यकर्त्यांनी इच्छुक असणे स्वाभाविक आहे. मात्र, सोशल मीडियावर राजू मिसाळ यांनी ‘इच्छुकांचे मनसुबे उधळून लावणार’ अशी बातमी व्हायरल झाली. त्यामुळे राष्ट्रवादीतील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पक्षात काम करीत असताना एखाद्या पदासाठी इच्छुक असणे गुन्हा आहे का? असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. परंतु, अशाप्रकारे मी कोणतेही वक्तव्य केले नाही, असा दावा मिसाळ यांनी केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button