breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; अधिकाऱ्यांची धावपळ!

पिंपरी : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा पुणे जिल्ह्याचे  माजी पालकमंत्री अजित पवार यांचे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शहरातील विविध प्रश्नासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी महापालिकेत अचानक एंट्री केल्याने पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.

दसऱ्या दिवशी थेरगाव येथील कार्यक्रमात सोसायटीच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्याच्या प्रश्नासाठी आणि शहरातील इतर समस्यांसाठी आणि महापालिकेतील इतर कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार थेट महापालिकेत दाखल झाले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी आयुक्त व प्रशासन शेखर सिंह यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक भाउसाहेब भोईर, नाना काटे, राजेंद्र जगताप, उषा वाघेरे, मंगला कदम, मयुर कलाटे, राजू बनसोडे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button