ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुंबई विमानतळाचे मुख्यालाय अहमदाबादला हलवण्याबाबतच्या केवळ अफवा – अदानी समूहाकडून स्पटीकरण

मुंबईः मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अदानी समूहाच्या ताब्यात आहे. त्याच दरम्यान कंपनीकडून अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या (AAHL) एएएचएलचे म्हणजे मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यासंदर्भात आता अदानी ग्रुपनं खुलासा केलाय.

 

मुख्यालाय अहमदाबादला हलवण्याबाबतच्या केवळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण अदानी समुहाने दिलं आहे. या संदर्भात अदानी समुहाने एक ट्विट केलं आहे. मुंबईबाबत आम्हाला सार्थ अभिमान आहे, मुंबईच्या रोजगार निर्मितीसाठी अदानी समूह कायम प्रयत्नशील राहणार असल्याचंही समूहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

देशातील चार प्रमुख विमानतळांचा कारभार अदानी समूहाच्या हातात गेलाय. यापूर्वी लखनऊ, मंगळुरू आणि अहमदाबाद विमानतळाचे नियंत्रण अदानी समूहाच्या हातात आले होते. त्यानंतर आता मुंबई हे अदानी समूहाच्या अखत्यारित असलेले चौथे विमानतळ आहे. यानंतर जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम ही विमानतळेही अदानी समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button