TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

ऑनलाईन टास्क भोवलेः नोकरीचे आमिष दाखवून महिलेची १३ लाखांची फसवणूक; चिखली पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी : एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून लिंक पाठवत वेगवेगळ्या टास्कद्वारे महिलेला १३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार ३ ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.१८) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रकाश दास, तीन महिला आरोपी व विविध बँक खातेधारक अशा १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नोकरीचे आमिष दाख वून आरोपींनी विविध लिंक पाठवून टास्क दिले. त्यानुसार, आरोपींनी टास्कद्वारे महिलेकडून ९ लाख ७५ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच फिर्यादी यांच्या नफ्याची रक्कम परत न देता त्यांनी एकूण १३ लाख ४५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button