breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळा; शरद पवार गटाची निवडणूक आयोगाला मागणी

मुंबई | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. तर या चिन्हाशी साम्य असलेलं पिपाणी हे चिन्ह देखील अनेक अपक्ष उमेदवारांना मिळालं होतं. पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ असं नाव आहे. चिन्हांमध्ये साम्य आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मतं अपक्ष उमेदवारांना मिळाली, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, ‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहिलं आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात शरद पवार गटाने म्हटलं आहे की, पिपाणी या चिन्हामुळे आम्हाला फटका बसला. त्यामुळे तुम्ही आता या संदर्भात उचित निर्णय घ्या, अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ.

हेही वाचा     –      चऱ्होलीतील शाळा आरक्षण खासगी संस्थेस देण्यास विरोध 

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे ४५ हजार मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात ३७ हजार मतं अपक्ष उमेदवाराच्या ‘पिपाणी’ला पडली आहेत. आता पक्षाने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की, त्यांनी पिपाणी हे चिन्ह वगळावं. तसेच शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button