Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

नितीश कुमार दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; शपथविधीला पंतप्रधानांची उपस्थिती

Nitish Kumar | बिहारचे ज्येष्ठ नेता आणि राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक असलेल्या नितीश कुमार यांनी आज दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. “मी नितीश कुमार सच्च्या निष्ठेने प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारे स्थापित भारताच्या संविधानाच्या प्रति सच्ची श्रद्धा आणि निष्ठा राखेन…,” अशा शब्दांत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एनडीएसोबतच्या नवीन कार्यकाळाची सुरुवात केली.

“मी नितीश कुमार सच्च्या निष्ठेने प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारे स्थापित भारताचे संविधानाच्या प्रति सच्ची श्रद्धा आणि निष्ठा राखेन. मी भारताची प्रभुता आणि अखंडता अक्षुन्न ठेवेन मी बिहारचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या कर्तव्यांचा श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक पालन करेन.” असं म्हणत नितीश कुमार यांनी शपथ घेतली.

हेही वाचा      :        जेजुरीतील जीवन प्राधिकरणाची ३५ कोटींची दाबलेली फाईल पुन्हा उघडणार!

२००५ साली पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर ‘जंगलराज’ विरुद्ध ‘विकास’ असा संघर्ष त्यांनी उभा केला. पहिल्या दशकभरात रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्था यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचे चित्र होते. आरजेडीच्या कारकिर्दीत सुमारे २५ हजार कोटी असलेला राज्याचा अर्थसंकल्प काही वर्षांत १ लाख कोटींवर पोहोचला; आज तो ३.१७ लाख कोटींवर गेला आहे. या दोन दशकांत नितीश कुमार यांनी बिहारच्या पायाभूत विकासाला आकार दिल्याचे मानले जाते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button