‘एक दिवस देशातून सर्व पेट्रोल पंप हद्दपार होतील’; नितीन गडकरी
![Nitin Gadkari said that one day all petrol pumps will be banished from the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Nitin-Gadkari-780x470.jpg)
मुंबई : हवेत उडणाऱ्या बस आणि कारचे स्वप्न दाखवणाऱया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला पुन्हा एकदा एक मोठे स्वप्न दाखवले आहे. वायुप्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार लवकरच नवीन धोरण आणणार आहे. एक दिवस असा येईल ज्या वेळी देशात कोणताही पेट्रोल आणि डिझेल पंप नसेल, असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर; मतदान केव्हा? वाचा..
‘डेटॉल बनेगा स्वस्थ इंडिया सीजन १०’ या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, आम्ही प्रदूषणाला कमी करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहोत. एक दिवस असा येईल ज्या वेळी कोणताही पेट्रोल-डिझेल पंप नसेल. याऐवजी आपल्याकडे इलेक्ट्रिक वाहनांसाठी इथेनॉल पंप आणि चार्ंजग स्टेशन असतील. एलएनजी आणि सीएनजी प्रणालीने तयार केले जातील.