Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

इस्लामपुरात निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ महारॅली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली | इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर शहरात जोरदार महारॅली काढण्यात आली. या महारॅलीस मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. रस्त्याच्या दुतर्फा थांबून मतदारांनी या महारॅलीचे जोरात स्वागत केले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या महारॅलीस महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील, गौरव नायकवडी, आनंदराव पवार, केदार पाटील, जयवंत पाटील, संजय कोरे, विक्रम पाटील, सुनीता भोसले-पाटील, स्नेहल नायकवडी, वैभव पवार, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, अशोक खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोल-ताशांच्या निनादात ही महारॅली निघाली. निशिकांतदादा तुम आगे बढो.. हम तुमारे साथ है.., निशिकांतदादांचा विजय असो, एकच वादा निशिकांतदादा…, महायुतीचा विजय असो.., निवडून निवडून येणार कोण…. निशिकांत दादांशिवाय हायचं कोण.., हवा कुणाची निशिकांतदादांची, अशा घोषणा या महारॅलीत सहभागी नागरिक देत होते. महारॅली पुढे गांधी चौक, महावीर चौक, छत्रपती संभाजी चौक, आझाद चौक, गणेश भाजी मंडई मार्गे पुन्हा गांधी चौक, यल्लामा चौक, तहसील कार्यालय मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. येथे या महारॅलीची सांगता झाली.

यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांनी ‘घड्याळ’ हे चिन्ह पहिल्या मतदान मशीनवर वरून तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जागृती करावी. महारॅलीस मिळालेला उत्साह कौतुकास्पद आहे. याच उत्साहाने निशिकांतदादांना मतदान मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून त्यांना विजयी करावे, असे आवाहन केले.

हेही वाचा     –      “जय भीम म्हणल्यामुळे विलासराव देशमुखांनी मंत्रीपद नाकारलं”, मतदानाच्या आधीच कॉंग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट 

यावेळी भास्कर मोरे, गजानन फले, अक्षय कोळेकर, सनी खराडे, सागर मलगुंडे, मन्सूर वाटरकर, अजित पाटील, अक्षय पाटील, अमित कदम, सयाजीराव जाधव, सूरज पाटील, सतेज पाटील, प्रवीण परीट, सतीश महाडिक, महेश पाटील, संजय पोरवाल, मानसिंग पाटील, वीरेंद्र राजमाने, मनीषा पाटील, सुप्रिया पाटील करिष्मा जाधव, सुनीताताई काळे, आशाताई पवार, तैसीन आत्तार, अन्नपूर्णा फल्ले, सुप्रिया पवार, मेघा अजित पाटील, स्नेहल पाटील, आशाताई पवार, सुनिता काळे, आरती खोत, तेजस्विनी पाटील, स्मिता पवार, गौरव खेतमर, संजय लाखे, संदीपराज पवार, सलीम कची, जलाल मुल्ला, बालम मोमीन यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निशिकांतदादांचे छायाचित्र व घड्याळ चिन्ह लक्षवेधी…

निशिकांतदादा यांचे छायाचित्र व घड्याळ हे त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले टी-शर्ट घातलेले, टोपी, उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते महारॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात निशिकांतदादांचे छायाचित्र व घड्याळ हे निवडणूक चिन्ह असलेले फलकदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यकर्त्यांनी घड्याळ या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना विजयी करण्याचे यावेळी आवाहन केले.

निशिकांतदादांचे चौका-चौकात जंगी स्वागत

या महारॅली दरम्यान, निशिकांतदादांचे शहरातील महिलावर्गांनी औक्षण करुन त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ठिकठिकाणी, चौका-चौकात नागरिकांनीही निशिकांतदादांचे पुष्पहार घालून स्वागत करत त्यांना निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button