टेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

डिजिटलायजेशनबरोबर सायबर क्राईमबाबत सजगतेची गरज – डॉ. दीपक शिकारपूर

  • सायबर एक्सपर्ट आनंद शिंदे लिखित “सायबर सिक्युरिटी वल्नेरेबिलिटी” पुस्तकांचे प्रकाशन

पिंपरी : “कोरोना संकटामुळे लोकांना डिजिटलायजेशनकडे महत्त्व समजले, हा महत्त्वाचा बदल घडून आला. या डिजिटलायजेशनबरोबर सायबर क्राईम आणि सायबर सुरक्षा महत्वाचा विषय बनला असून याबाबत सर्वांमध्ये सजगता निर्माण करण्याची खरी गरज आहे. त्या दृष्टीने आनंद शिंदे यांनी अनुभवाच्या जोरावर “सायबर सिक्युरिटी वल्नेरेबिलिटी” लिहिलेले पुस्तक महत्त्वाचे असल्याचे आयटी तज्ज्ञ व कायनेटिक कम्युनिकेशन्सचे संचालक डॉ. दीपक शिकारपूर यांनी म्हटले.

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आनंद शिंदे लिखित “इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी” व “सायबर सिक्युरिटी वल्नेरेबिलिटी” या दोन पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, दि. 13 जानेवारी 2023 रोजी निगडी येथील आयआयसीएमआर एमसीए कॉलेजमध्ये डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकाशन समारंभासाठी व्यासपीठावर आयआयसीएमआर एमसीए कॉलेजचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी, नॉव्हेल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

पुस्तकाविषयी लेखक आनंद शिंदे म्हणाले की, “देशात व देशाबाहेर विविध नामांकित कंपन्यांसाठी सायबर एक्सपर्ट म्हणून काम करताना विविध अनुभव आले. ते ब्लॉग रुपात इतरांपर्यंत वेळोवेळी पोहोचविले. कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होम सुरू पुस्तकाव्दारे हा अनुभव सर्वांपुढे मांडण्याचा विचार केला. त्यानंतर ‘इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी’ हे पुस्तक लिहिले. देशाबाहेर असल्याने त्यांचे प्रकाशन होऊ शकले नव्हते. तरी देखील त्यांच्या असंख्य प्रति विक्री झाली. अधिक अभ्यास आणि माहितीचा अंतर्भाव करून “सायबर सिक्युरिटी वल्नेरेबिलिटी” हे पुस्तक पूर्ण केले. पुस्तकाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत आवश्यक माहिती व्हावी. तसेच, सायबर क्राईमच्या संकटापासून दूर राहण्यासाठी हे पुस्तक सर्वांनाच उपयोगी ठरेल. डॉ. अभय कुलकर्णी आणि अमित गोरखे यांनी आनंद शिंदे यांचे सायबर सिक्युरिटी संदर्भातले‌ योगदान आणि याविषयी सर्वांसाठी पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले.‌

एनआरआय मराठी तरुणाचे असेही देशप्रेम

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले आनंद शिंदे यांनी सायबर एक्सपर्ट म्हणून आपले करियर घडवले. पोलंडमध्ये एका युरोपियन बँकेसाठी ते सध्या सायबर सल्लागार म्हणून कार्यत आहेत. तसे असताना पुस्तक लिहून पूर्ण असाताना त्यांनी ते प्रकाशित केले नाही. मुळचे पिंपरी-चिंचवडचे रहिवाशी असलेल्या एनआरआय आनंद शिंदे यांना देशाविषयी प्रेम आहे. देशप्रेमासाठी देशात आल्यानंतरच पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा चंग बांधला होता. त्या प्रमाणे काही दिवसांसाठी शहरात आलेले असताना त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button