अमृता फडणवीसांच्या नव्या रीलवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप
![NCP objected to Amrita Fadnavis' new reel](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/amruta-fadnavis-and-Sharad-pawar-780x470.jpg)
शूट करण्याआधी अधिकाऱ्यांकडून कायदेशीर परवानगी घेतली होती का?
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असल्याचे पहायला मिळते नुकताच त्यांनी ‘आज मैने मूड बना लिया’ या नव्या गाण्यामुळे प्रसिद्धीत आल्या आहेत. या गाण्यातील त्यांचा ग्लॅमरस लुक बराच व्हायरल झाला आहे. मात्र अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर आता राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे.
अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ आपले पती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी बंगल्यावर शूट केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तसेच अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ शूट करण्याआधी अधिकाऱ्यांकडून कायदेशीर परवानगी घेतली होती का? असा सवाल राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी आक्षेप घेत हा व्हिडीओ सरकारी निवास्थानी शूट केला गेला असल्याचं म्हटलं आहे.
तसेच अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ शूट करण्याधी अधिकाऱ्यांकडून कायदेशीर परवानगी घेतली होती का? असा सवाल राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला आहे.