राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अर्ज मागविले
पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया १४ नोव्हेंबरपासून सुरू

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा तर्फे उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया १४ नोव्हेंबर २०२५ पासून २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे.शहराध्यक्ष योगेश बहल यांनी याबाबत निवेदन दिले आहे.
शहराध्यक्ष योगेश बहल यांनी म्हटले आहे की, ३२ प्रभागांतील इच्छुक उमेदवारांनी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पक्षाचे खराळवाडी, पिंपरी येथील कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत उमेदवारांनी खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. पूर्ण नाव, विधानसभेचे व प्रभागाचे नाव, मतदार यादीतील कार्य अहवाल देणे महत्वाचे आहे.
हेही वाचा – पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता मिळणार, केंद्र सरकार करू शकते आज घोषणा
महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटनात्मक तयारीस सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे.




