शरद पवारांच्या राजीनाम्याचा कार्यकर्त्यांना धक्का! रक्ताने लिहलं पत्र
![NCP activist wrote a letter in blood to Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/sharad-pawar-2-780x470.jpg)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी भावूक झाले आहेत. शरद पवार यांनी आपला निवृत्तीचा हा निर्णय मागे घ्यावा यासाठी विनंती केली जात आहे. मात्र पुण्यात एका साहेब समर्थक म्हणून घेणाऱ्याने कार्यकर्त्याने स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून घेतलेला निर्णय मागे घेण्याची विनवणी केली आहे.
पुण्यातील साहेब प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काळे याने आपल्या रक्ताने पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना पत्र लिहीत भावना व्यक्त केल्या आहेत. साहेब आपण घेतलेला हा निर्णय कोणालाच मान्य नसून आपल्या या निर्णयाने आम्ही पोरके झाले आहोत. आमचे दौवत असून आपण हा निर्णय बदलावा, अशी मागणी या पत्रातून केली आहे.
शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचे प्रकाशन आज झाले. या कार्यक्रमात शरद पवार यांनी ही घोषणा केली. पवार म्हणाले की, माझी निवृत्ती सार्वजनिक जीवनातून नाही. या आधीही मी संशोधन, कृषी, शिक्षण क्षेत्रात काम करत होतो. यापुढे देखील मी त्या क्षेत्रात काम करत राहील. शरद पवार यांनी कार्यक्रमात ही घोषणा करताच समोर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला. शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला.