‘महाराष्ट्र, मध्यप्रदेशात वाळू तस्करांचे तर गुजरातमध्ये दारू माफियांचे सरकार’; नाना पटोलेंचा भाजपवर आरोप
![Nana Patole said that in Maharashtra, Madhya Pradesh is the government of sand smugglers and in Gujarat is the government of liquor mafia](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/nana-patole-780x470.jpg)
गुजरातमध्ये दारूबंदी आहे, पण तिथं अवैध्यरित्या दारू विक्री करतात
राज्यात वाळू तस्कर निर्माण करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. महाराष्ट्रात घरकुलासाठी वाळू मिळत नाही, यामुळे सर्वसामान्यांना घर बनवता येत नाही. या करता एक धोरण आम्ही या सरकारला तयार करायला सांगतो आहे पण हे तस्कराचे सरकार धोरण करायला तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची लूट करणारा भाजपा तस्कर करणारा पक्ष आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मध्यप्रदेशात माफियांच्या माध्यामातून तेथील सरकारने नदिमधील वाळू गायब करून टाकली. तेथील सरकारच वाळू माफियांचे काम करते, असे चित्र आहे. तेच कृत्य आज महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळेच नागपूरचे जे काही पार्सल तुम्ही इथून पाठवलं होत त्याच पार्सलच्या माध्यमातून लूट सुरू आहे, असं नाना पटोल म्हणाले.
गुजरातमध्ये दारूबंदी आहे, पण तेथील भाजपाचे सगळे नेते आणि त्यांचे बगलबच्चे तिथं अवैध्यरित्या दारू विक्री करतात आणि दारू विकून जास्त पैसे कमवितात, असे तिथे निवडणूक प्रचारासाठी गेलो असता समजले, असंही नाना पटोले म्हणाले.