ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘शहरातील ‘नीचे दुकान ऊपर मकान’ पद्धत मोडीत काढा’; नाना काटे

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना मागणी

पिंपरी : रक्षाबंधन दिवशी पूर्णानगर, चिंचवड येथील सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही आकुर्डी प्राधिकरण येथील म्हाळसकांत चौकाजवळ जयहिंद चौकात सारडा क्लॉथ सेंटर कपड्यांचे दुकान घरामध्येच बनवले होते. त्याला लागलेल्या २३ फेब्रुवारी २०२१ मधील आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक दुकान गाळ्यात “नीचे दुकान ऊपर मकान” अशा पद्धतीने राहणाऱ्या कुटुंबावरती मानसिक जीवाचे रक्षण करण्यासाठी कारवाई करा अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी 18 फूट उंचीचे दुकाने बांधण्यात आलेली आहे. अशावेळी बाहेरील राज्यातून आलेली अनेक कुटुंबे या दोन मजली दुकानांचा पोटमाळा बनवून त्यामध्ये घरगुती वापरासाठी किंवा राहण्यासाठी उपयोग करताना दिसून येत आहेत. दुकानांमध्ये जास्तीचा वेळ देता द्यावा आणि राहण्यासाठी वेगळे भाडे जाऊ नये यासाठी काटकसर म्हणून ते पोटमाळ्याचा उपयोग राहण्यासाठी करतात. मात्र, आपत्तकालीन परिस्थितीमध्ये या “नीचे दुकान उपर मकान” पद्धतीमुळे नागरिकांच्या जीवास धोका होताना दिसत आहे.

हेही वाचा – वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा ‘टेरिटरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

तर काही ठिकाणी दुकानाचे संरक्षण व्हावे यासाठी कामगारांनाही अशा दुकानांमध्ये मालक राहण्यासाठी प्रवृत्त करताना दिसून येत आहेत. पुणे शहरातही यापूर्वी असेच कपड्याच्या दुकानात लागलेल्या आगीमध्ये कामगारांचा मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे. यासाठी महापालिकेने बांधकाम परवाना विभागाकडून पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम किंवा पोटमाळे केवळ व्यवसायासाठीच वापरण्यात यावेत याबाबत मानवी जीवाचे रक्षण व्हावे या हेतूने कारवाई करावी अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button