breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा, नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यंमत्री

Nayab Singh Saini |  लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना हरियाणामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा नेते नायब सिंह सैनी नवे मुख्यमंत्री झाले आहेत.

मनोहरलाल खट्टर यांच्या मंत्रिमंडळात १४ मंत्री होते. जननायक जनता पार्टीकडून उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासह तीन मंत्री होते. खट्टर यांच्यासह त्यांनीही राजीनामा दिला. आज मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला.

हेही वाचा    –    ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ कधी आणि कुठे पाहता येणार?

नायब सिंह सैनी कोण आहेत?

ओबीसी समाजाचे नायब सिंह सैनी (५४) कुरुक्षेत्र मतदारसंघाचे खासदार आहेत. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भाजपाने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. १९९६ साली नायब सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. संघटन बांधणीपासून कामाला सुरुवात केल्यानंतर हळूहळू त्यांचा भाजपामध्ये वरिष्ठ नेतेपदापर्यंतचा प्रवास पार पडला. २००२ साली अंबाला जिल्ह्याचे भाजपा युवा मोर्चाचे ते जिल्हा सरचिटणीस झाले. त्यानंतर २००५ साली त्यांची अंबालाचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली.

२०१४ साली नारायणगड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. २०१६ साली त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान सैनी कुरुक्षेत्र लोकसभेतून निवडणुकीस उभे राहिले आणि त्यांचा विजयही झाला. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ३.८३ लाख मताधिक्यांनी पराभव केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button