breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
मुंबई : शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य, काँग्रेस सतर्क, आमदारांना महत्त्वाचे आदेश
![एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य, काँग्रेस सतर्क, आमदारांना महत्त्वाचे आदेश](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/एकनाथ-शिंदेंचं-नाराजीनाट्य-काँग्रेस-सतर्क-आमदारांना-महत्त्वाचे-आदेश.jpg)
मुंबई : शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे हे २० आमदारांसह सुरतला गेल्यानं राज्यातील राजकारणात राजकीय भूकंप झाला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या सुरतला जाण्यामुळं निर्माण झालेली राजकीय स्थिती आणि विधानपरिषद निवडणुकीत स्वीकारावा लागलेला पराभव या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक पार पडली. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभव स्वीकारावा लागला. तर, दुसरीकडे भाई जगताप हे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार असून देखील ते विजयी झाले. विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक पार पडली. महाविकास आघाडी म्हणून आमचे तीन पक्ष आणि मित्र पक्ष एकत्रितपणे काम करत आहोत. जी नवीन स्थिती निर्माण झालीय त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
- राज्यातही घडामोडी वाढल्या
- काँग्रेस आमदारांना मुंबईत थांबण्याच्या सूचना