Kasba Election : खासदार गिरीश बापट यांनी बजावला मतदानाचा हक्क
![MP Girish Bapat exercised his right to vote](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/girish-bapat-780x470.jpg)
पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला शेवटची काही मिनिटे बाकी असताना अखेर गिरीश बापट यांनी मतदानासाठी हजेरी लावली आहे. कसबा मतदार संघातील अहिल्यादेवी हायस्कूल गर्ल्स शनिवार पेठ येथे संध्याकाळी 5 वाजता मतदानासाठी बापट उपस्थित राहिले.
गिरीश बापट हे आजाराशी झुंझ देत असताना देखील मतदान करण्यासाठी बाहेर आले त्यामुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. गेले 25 वर्ष ते याच प्रभागातून आमदार होते व आता खासदार देखील आहेत. त्यामुळे त्यांचे मत हे महत्वाचे मानले जात आहे.
गिरीश बापट हे प्रचारात देखील एक दिवस हजर होते आणि आजारी असताना देखील प्रचारात सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक टिपा टिप्पणी झाली मात्र त्यानंतर आज गिरीश बापट यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अनेक दिवसांपासून बापट हे आजारी आहेत आज देखील मतदानासाठी येताना त्यांना व्हीलचेअर वर बसवून घेऊन जाण्यात आले.
वेळी त्यांच्या नाकाला ऑक्सिजनचे पाईप देखील लावलेले हो ते. कसबा पेठ येथे 5 वाजेपर्यंत 29% मतदान झाले आहे. निवडणुकीमध्ये प्रत्येक मत हे महत्वाचे असते यामुळेच गिरीश बापट हे देखील आपला मताधिकार बजावण्यासाठी आले होते.