breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

दिल्ली कोर्टात मोस्ट वॉण्टेड गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या; पोलिसांकडून हल्लेखोरांचा एन्काऊंटर

नवी दिल्ली |

दिल्लीतला मोस्ट वाण्टेड गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याची रोहिणी कोर्टात गोळी झाडून हत्या करण्यात आली. रोहिणी कोर्ट नंबर २ मध्ये जितेंद्रला हजर केलं असता वकिलांच्या वेषात आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली. जितेंद्रचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी शूटआऊट करत हल्ला करणाऱ्या दोघांना ठार केलं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून हा एन्काऊंटर करण्यात आला. हल्ला करणारे विरोधी गटातील होते असं सांगितलं जात आहे. शूटआऊटमध्ये एकूण चौघे ठार झाले आहेत.

जितेंद्र गोगी, एक कुख्यात गुंड होता आणि अनेक गुन्हेगारी प्रकरणात तो दोषी आढळला होता.सध्या तो तिहार येथे तुरुंगात होता. त्याला न्यायालयात हजर केले जात असताना प्रतिस्पर्धी टोळीचे सदस्य वकीलांचे म्हणून कपडे घालून कोर्टात दाखल झाले आणि गोळीबार केला. कोर्टाच्या आवारात कडक सुरक्षा आहे आणि प्रत्येकाची तपासणी गेटवरच केली जाते. हल्लेखोरांनी वकिलांची कपडे घातल्यामुळ ते सुरक्षा तपासणीतून सहज निसटले. दिल्ली पोलीस गुंड जितेंद्र गोगीला संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी रोहिणी कोर्टात घेऊन आले होते. या दरम्यान वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या दोघांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी दोघांना ठार केले. गोगीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला. जितेंद्र गोगी यांच्यावर खून आणि दरोड्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते, जिथून त्याला खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड गँगस्टर जितेंद्र मान उर्फ ​​गोगीला त्याच्या तीन साथीदारांसह अटक करण्यात आली. दिल्लीतील गोगीवर ४ लाख आणि हरियाणामध्ये ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. हरियाणा पोलीस रागिनी गायिका हर्षिया दहिया हत्या प्रकरणात जितेंद्रचा शोध घेत होते. दिल्ली पोलिसांनी गोगी आणि त्याच्या साथीदारांना गुरुग्राममधील एका अपार्टमेंटमधून अटक केली होती. गोगीने नरेलामध्ये आम आदमी पार्टीचे नेते वीरेंद्र मान यांना गोगी टोळीच्या गुंडांनी २६ गोळ्या घातल्या होत्या. २०१८ मध्ये या टोळीची टिल्लू टोळीशी झुंज झाली, ज्यात ३ लोक ठार आणि ५ जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील उर्फ ​​टिल्लू आणि गोगी टोळीमध्ये जुने वैर आहे. टोळी युद्धात दोन्ही टोळ्यांचे डझनभर लोक मारले गेले आहेत. ताजपुरीया गावातील टिल्लू आणि अलीपूर गावातील गोगी हे एकेकाळी मित्र होते. पण नंतर दोघांच्या वेगवेगळ्या टोळ्या झाल्या. दक्षिण पश्चिम, द्वारका, बाहरी, रोहिणी, उत्तर आणि दक्षिण पश्चिम दिल्ली येथे झालेल्या प्रमुख टोळी युद्धांमध्ये गोगी टोळीचा हात आहे. काही टोळीयुद्धांमध्ये, या टोळीवर ५० ते १०० फायर केल्याचे आरोप केले गेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button