breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अखंड भारत कधीपर्यंत होईल? मोहन भागवत म्हणाले..

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताबाबत मोठं विधान केलं आहे. भारतापासून वेगळे झालेल्या देशांना त्यांची चूक कळत असून त्यांना पुन्हा भारतात सामील व्हायचे आहे, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

नागपुरमधील वसतिगृहात विद्यार्थ्यांशी मोहन भागवत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना अखंड भारत कधीपर्यंत होईल? असा सवाल विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, अखंड भारत कधीपर्यंत होईल, हे मी सांगू शकत नाही. ज्योतिषाकडे पाहायला लागेल. पण, तरूणांनी ठरवले तर त्यांच्या म्हातारपणाआधीच अखंड भारत होईल. अखंड भारत म्हणजे केवळ नकाशावरच्या रेषा पुसणे नाही. त्यासाठी आमच्या नजीकच्या देशांमध्ये भारतीयत्व रूजवणे आवश्यक आहे.

हेही वाचा – ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ म्हणत तरूणाची आत्महत्या!

भारतापासून वेगळे झालेले अनेक देश आज चूक केली, हे मान्य करतात. आम्ही एकाच भारतभूमीचे अंग आहोत. अखंड भारतात यायचे असेल तर त्यांना स्वार्थ, कट्टरता आणि फुटीरवाद सोडावा लागेल. त्यावेळी काहीही बदल न करता सगळे एक होऊ. आम्ही आजही नजीकच्या देशांना मदत करतो. कारण, आम्ही सर्व एकाच भारत मातीत जन्मलो आहे, असं मोहन भागवत म्हणाले.

भारताला सामाजिक विषमतेचा मोठा इतिहास आहे. आमच्याच बांधवांना आम्ही जातींवरून पशुसारखी वागणूक दिली. दोन हजार वर्षे अनेक लोक गुलामीचे जीवन जगले. महाभारतातही जातीपातीची उदाहरणे दिसतात. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना समान पातळीवर आणेपर्यंत आणि भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे. संविधानाने दिलेले आरक्षण संघालाही मान्य आहे, असंही मोहन भागवत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button