breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

मोदी ३.० सरकारचं पहिला अर्थसंकल्प आज; मोठ्या घोषणांची शक्यता!

Union Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी मोदी सरकारच्या 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. यंदाचा अर्थसंकल्प ४७ लाख ६५ हजार ७८६ कोटींचा असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री सीतारामन यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल. हा अर्थसंकल्प २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा रोड मॅप देईल. जो भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची ब्लू प्रिंट देखील तयार करेल, असं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.

अर्थसंकल्पात ‘या’ मोठ्या घोषणांची शक्यता

  • पंतप्रधान किसान सन्मान निधी वाढवला जाऊ शकतो.
  • कृषी क्षेत्राच्या विकास दराला गती देण्यासाठी उपाययोजना जाहीर करण्याची शक्यता

हेही वाचा     –      निर्मला सीतारामण यांनी १० वर्षात काय चमत्कार केला? संजय राऊतांचा सवाल

  • ग्रामीण भागांसाठी पंतप्रधान आवास योजनांसंदर्भात घोषणांची शक्यता
  • मनरेगाच्या कामकाजाचे दिवस वाढण्याची शक्यता असून शेतीशी संबंधित कामांचाही समावेश करण्याबाबत घोषणा केल्या जाऊ शकतात.
  • महिला, तरुण, शेतकरी आणि गरीबांवर लक्ष केंद्रीत केलं जाऊ शकतं.
  • नव्या कर प्रणालीमध्ये आयकर सूट स्लॅबची मर्यादा 5 लाख असू शकते.
  • गृहकर्ज घेतल्यावरही नव्या सवलतीची शक्यता.
  • पायाभूत सुविधांवर होणारा खर्च वाढवला जाऊ शकतो.
  • एमएसएमईवर विशेष लक्ष दिलं जाऊ शकतं.
  • OPS बाबत परिस्थिती स्पष्ट होऊ शकते.
  • ईव्ही म्हणजेच, इलेक्ट्रिक वाहनांबाबत प्रोत्साहनं दिलं जाऊ शकतं.
  • ग्रीन एनर्जीला चालना मिळू शकते.
  • पीएलआय योजनेचा विस्तार इतर भागांत करता येईल.
  • श्रम सुधारणांबाबत कामगार संहितेबाबत स्पष्टता देता येईल.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button