breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

मनसेचा महायुतीला पाठिंबा, पुण्यात मतांचं विभाजन; कुणाच्या पथ्यावर पडणार?

पुणे | काल गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचे घोषीत केले. राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर पुण्यात मनसेच्या सरासरी असलेल्या दहा टक्के मतांवर त्याचा कसा परिणाम होईल. याची चर्चा जोरदार सुरू झाली. गेल्या महानगरपालिका तसेच विधानसभा निवडणुकीत मनसेला लाखोंच्या संख्येने मतं पडली होती.  यंदाच्या निवडणुकीत मात्र मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात दोन्हीही नेते हे पुर्वश्रमीचे मनसेचे राहिले आहेत. त्यामुळे मनसेने जाहिर केलेल्या पाठिंब्यामुळे मतांचं विभाजन होणार का ? अशीही चर्चा सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुकांचा विचार केल्यास २०१२ साली मनसेचे जवळपास २९ नगरसेवक पाच लाख १९ हजार ४३७ मतं घेऊन निवडून आले होते. त्यानंतरच्या २०१७ च्या निवडणुकीत मात्र दोन नगरसेवकांना तीन लाख ७३ हजार ६४५ मते पडली होती. तर लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास 2009 साली मनसेच्या खात्यात 75 हजार 887 तर 2014 साली 93 हजार 449 मते पडली होती. अशातच आता मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे याचा फायदा आपुसकच मोहोळांना होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा    –    नाना पटोलेंचा घातपात करण्याचा डाव होता का? काँग्रेस नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप 

महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र वंचितकडून मनसेचे माजी नगरसेवक वंसत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे लोकसभेची रंगत आणखी वाढली आहे. 2019 साली दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या विरोधात कॉंग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी दिली होती. बापट यांना 6,32,83,561 अधिक मतं पडली होती. तर विरोधात असलेल्या मोहन जोशी यांना 3,08,20,729 मत पडली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचितकडून अनिल जाधव यांनी तब्बल 64, 7936 मत पारड्यात पाडून घेतली होती. आता वंचितकडून वंसत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अशातच 2014 च्या निवडणुकीत मनसेकडून उभे असलेल्या दिपक पायगुडे यांनी जवळपास 93,5025 मत मिळवली होती. त्याआधी 2009 मध्येही मनसेला 75930 मतं मिळाली होती. याशिवाय २०१२ आणि २०१७ च्या महापालिका निवडणुकीत मनसेला अनुक्रमे पाच आणि तीन लाख मते मिळाली होती. आता पुणे शहाराशी संबंधित असलेल्या शिरूर, हडपसर आणि पुणे लोकसभा मतदारसंघात त्याचा फायदा होण्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button