आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

बीड | भारतीय जनता पार्टीचे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (७ जुलै २०२५) रात्री १०:३० ते ११:०० च्या सुमारास अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरच्या सुपा शिवारातील जातेगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. मृत व्यक्तीचे नाव नितीन शेळके असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश धस यांचा मुलगा सागर धस हा आष्टी येथून पुण्याला जात असताना त्याच्या कारने (MH 23 BG 2929) नितीन शेळके यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात नितीन शेळके (रा. जातेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. सागर धस याच्यासोबत सचिन कोकणे (रा. तवलेवाडी, आष्टी) हा देखील कारमध्ये होता.
हेही वाचा : ‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे
सुपा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. स्थानिक पोलिसांनी कोणताही राजकीय दबाव नसल्याचे सांगितले असून, कठोर कारवाईची मागणी होत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.