breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शिंदे गटाच्या आमदाराची पोलिसांसमोर युवकांना काठीने मारहाण, व्हिडीओ व्हायरल

मुंबई | शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एका मुलाखतीत आपण वाघाची शिकार केल्याचा दावा केला होता. यानंतर वन विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता त्यांचा पुन्हा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते युवकांना काठीने मारहाण करताना दिसत आहेत. टीव्ही-9 ने हे वृत्त दिलं आहे.

आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शिवजयंती मिरवणुकी दरम्यानचा आहे. या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड युवकांना पोलीस काठीने मारहाण करताना दिसत आहे. त्यांच्या बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना सपासप मारहाण ते करत आहेत. आमदार गायकवाड काठीने युवकांना मारहाण करत असताना पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

हेही वाचा      –      संभाजी भिडेंची कार अडवत घोषणाबाजी, काळे झेंडेही दाखवले 

दरम्यान, काही दिवसांपुर्वी आमदार संजय गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव मृत्यूंजय गायकवाड अडचणीत आले आहे. शेत जमीन बळकावल्याच्या प्रकरणात त्यांच्यासह काही जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी आदेश दिले होते. अखेर २८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button