breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘महापालिकेत पुन्हा भाजपाचा झेंडा फडकणार’; आमदार अश्विनी जगताप

चिंचवड पोटनिवडणुकीत विजयानंतर महायुतीचा आभार मेळावा

बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांसह सर्व नेत्यांना दिले धन्यवाद

पिंपरी : विकास चौधरी

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीच्या सर्व पक्षांनी मेहनत घेतली त्यांचे मी आभार मानते. तुमच्यामुळेच आपण ही निवडणूक विजयी झालो. तसेच, स्व. लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या कार्याला लोकांनी साथ दिली. पोटनिवडणूक ही रंगीत तालीम होती. आगामी निवडणुकीत महायुतीचे किमान १०० नगरसेवक निवडून येतील. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेत भाजपाचा झेंडा फडवला जाईल, असा विश्वास चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला.

चिंचवड पोटनिवडणुक पार पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे उमेदवार अश्विनी जगताप या निवडून आल्या. याच चिंचवड पोटनिवडणुकीत विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने आभार मेळावा घेण्यात आला.

या आभार मेळाव्याला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांच्यासह माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड पोटनिवडणूक लागली आणि अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत जगताप यांनी वर्चस्व राखले. त्यानिमित्ताने भाजपातर्फे आभार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात स्व. लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या मेळाव्यात अन्य पक्षांच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदार आश्विनी जगताप यांच्या समोर आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या व येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आम्हाला देखील जागा मिळाल्या पाहिजेत व आमच्या पक्षाला आपली साथ मिळायला हवी आहे .असे इतर पक्षाच्या शहर अध्यक्षांनी आपले मत या वेळी व्यक्त केले.

मतदानाची टक्केवारी घटली, कामाला लागा : खासदार बारणे

चिंचवड पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाची मतदान टक्केवारी घटली आहे. ते मतदान का घटले? याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. विरोधी पक्षाचे मतदान वाढले आहे. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत विरोधकांच मनोबल वाढले. याच्यासाठी आपल्याला आपले कार्यकर्ते मजबूत करण्याची गरज आहे, असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडून आनण्यासाठी भाजपा, शिवसेना, आरपी आय ( आठवले गट), रा,.स.पा .रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना, प्रहार संघटना, या सर्व मित्र पक्षांची साथ मिळाली. तसेच, बूथवर ज्या व्यक्तींना जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी ती चांगल्याप्रकारे पार पाडली यांची देखील उपस्थित होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button