🚨 मिशन PCMC : पिंपरी-चिंचवडमध्ये RPI महापालिकेच्या 15 जागांवर उमेदवारी लढवणार!
महायुतीच्या जागा वाटपाकडे लक्ष : आठवले गटाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांची माहिती

पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना अंतिम करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब केले असून, केवळ २ हरकती मान्य केल्या आहेत. प्रभाग क्रमांक १० आणि ११ मध्ये काहीसा बदल आहे.
दरम्यान, भाजपा महायुती सरकारमधील घटकपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शहरातील ३२ प्रभागांमधील १५ जागांवर उमेदवार लढवण्याच्या तयारीत आहे. याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही ‘‘पूर्ण ताकदीने कामाला लागा’’ अशा सूचना दिल्या आहेत.
शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासआठवलेयांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली. निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष 15 जागा लढवणार आहे. शहरांमधील ज्या जागा रिपब्लिकन पक्ष लढणार आहे याची संपूर्ण यादी आठवले साहेबांना सुपूर्द करण्यात आली. साहेबांनी निवडणुकीला जोरदार तयारी करा व कामाला लागा असे स्पष्ट आदेश दिले आहेत. लवकरच साहेबांच्या उपस्थितीत शहरात भव्य सभा आयोजित करण्यात येणार आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत महाराष्ट्र महिला सचिव इलाताई ठोसर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकाते महाराष्ट्र निमंत्रक कामगार नेते विनोद चांदमारे माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे सरचिटणीस दयानंद वाघमारे कार्याध्यक्ष योगेश भोसले युवक अध्यक्ष धम्मरत्न गायकवाड महिला अध्यक्ष कमलताई कांबळे महिला नेत्या लताताई ओवाळ वरिष्ठ उपाध्यक्ष धर्मापाल तंतरपाळे सुंदर कांबळे युवा नेते संतोष डेंगळे मनोज जगताप अल्विन शेपर्ड रोहन सूर्यवंशी युवक आघाडी नेते तेजस सुरते यावेळी उपस्थित होते.