breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मिशन- २०२२: अपक्ष आघाडीतील सर्व नगरसेवक माझ्यामागे राष्ट्रवादीत येणार : कैलास बारणे

पिंपरी | प्रतिनिधी

पवना जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे,अशी आमची मागणी आहे. मागच्या सत्तेतील पालकमंत्री कितीवेळा शहरात आले. त्यांनी किती प्रश्न सोडविले. भाजपचे नगरसेवक केवळ सोशल मीडियावर फोटो टाकतात. नारळ फोडतात. काम चालू असतानाच चौकशीची पत्रे देतात. विकासकासाठी त्यांनी कधी तरतूद केली का, अपक्ष नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. तेही हळूहळू येतील. सर्व अपक्ष नगरसेवक पाठीमागून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत, असा दावा महापालिकेतील अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी केला आहे.

अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी आज (दि.१६) मुबाईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनतर शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, संतोष बारणे, प्रवक्ते फजल शेख यांनी महापालिका विरोधी पक्षनेता दालनात दुपारी पत्रकार परिषद घेतली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शहराची विकासकामांमुळे चर्चा होत होती. मागील साडेचार वर्षांपासून भाजपच्या राजवटीत भ्रष्टारामुळे शहराची चर्चा होत आहे. सत्ताधा-यांनी शहर स्वच्छतेची वाट लावली, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी केली.

भाजपचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील त्यांच्या ताब्यात असलेल्या महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत गप्प का आहेत” असा सवाल शहराध्यक्ष वाघेरे यांनी केला.

‘भाजपच्या सत्तेत विकास कामांऐवजी भ्रष्टाचाराची चर्चा होत आहे. भाजपच्या काळात शहरातील स्वच्छतेची वाट लागली”, असा आरोप संतोष बारणे यांनी केला.

माजी महापौर योगेश बहल म्हणाले, स्थायी समिती अध्यक्षांच्या लाचप्रकरणातील अटकेच्या कारवाईतून भाजपच्या पारदर्शक, स्वच्छ कारभाराची प्रचिती आली आहे.  महापालिकेची आगामी निवडणूक जवळ आली. निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी भाजपने टक्केवारी दणक्यात वाढविली. स्थायी समिती अध्यक्षांना हे कोणी करण्यास सांगितले”, असा सवालही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button