राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्वयंरोजगार विभाग राज्य प्रमुख पदी मेघा पवार नियुक्ती
पक्षाने मला दिलेल्या संधीचे मी सोने करेन - मेघा पवार
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या स्वयंरोजगार विभाग राज्य प्रमुख पदी मेघा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मेघा पवार यांची रोजगार व स्वयंरोजगार विभाग राज्य प्रमुख पदी आज नियुक्ती करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. या सेलच्या माध्यमातून बेरोजगारी महिला बचतगट, युवक, महिला यांच्यासाठी अनेक संधी निर्माण होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान
सेलच्या माध्यमातून गृह उद्योग निर्मिती, व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन, शासकीय योजनां लोकांपर्यंत पोहोचवणे, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे, बाजारपेठेची उपलब्धता तसेच बचत गटाचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर काम करण्यात येणार आहे. यामुळे आर्थिक सक्षमीकरणाच्या अनेक संधी निर्माण होतील तसेच पक्षाने मला दिलेल्या संधीचे मी सोने करेन, असा विश्वास मेघा पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केला आहे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी केंद्रीय मंत्री सुबोधजी मोहिते (पाटील), दिलीप भाऊ पोटफोडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.