मावळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती
मंत्रालयात बैठक: आमदार सुनिल शेळके तसेच वित्त व नियोजन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित
![Ambitious projects in Maval will get momentum](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/sunil-shelke-780x470.jpg)
मावळ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मावळ विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रालयात गुरुवार (दि.१) बैठक संपन्न झाली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार सुनिल शेळके तसेच वित्त व नियोजन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याबैठकीत मावळातील खालील विकासकामे, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची सद्यस्थिती व पुढील कार्यवाही यावर सविस्तर चर्चा झाली.
● आई एकविरा देवी मंदिर परिसर विकास आराखडा व रोप-वे उभारणे कामास गती देण्यासाठी वन विभाग व पुरातत्व विभागाच्या संपूर्ण परवानग्या (NOC) दोन महिन्याच्या आत घेण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
● जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी कार्ला ते देहूरोड दरम्यान आवश्यक असलेल्या आठ ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला MSRDC च्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
● जांभूळ येथे क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर केलेला असून तालुकास्तरीय अद्ययावत क्रिडा संकुल उभारण्यासाठी तात्काळ मान्यता द्यावी.
● ग्लास स्कायवॉक प्रकल्पाचा संपूर्ण विकास आराखडा राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकल्पांना गती देण्याच्या सुचना बैठकीत दिल्याने मावळच्या सर्वांगीण विकासाच्या दूरदृष्टीतून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामांचा वेग वाढणार आहे.
– आमदार सुनिल शेळके, मावळ विधानसभा.