TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

डीएसके कुंजबन सोसायटीत मराठी दिन उत्साहात

  • काव्य मैफल : बाल कलावंतांनी सादर केल्या बहारदार काव्यपंक्ती

पिंपरी : मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा अभिमान नव्या पिढीमध्ये रुजावा आणि मराठी भाषेप्रती आपुलकी निर्माण व्हावी. या संकल्पनेतून डीएसके कुंजबन हाउसिंग सोसायटीच्या पुढाकाराने यावर्षी मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्याला बाल कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दि. २७ फेब्रुवारी हा मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने डीएसके कंजुबन सोसायटीतील रहिवाशांनी दि. २६ फेब्रुवारी रोजी मराठी भाषेतील काव्यांच्या मैफिलीचे आयोजन केले होते.
यावेळी सोसायटीचे चेअरमन योगेश सूर्यवंशी, सचिव उत्तम नलावडे यांच्यासह सोसायटी कमिटी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात सर्वात छोटी ४ वर्षाची काव्यप्रेमी ऋणी वाळवेकर आणि सोसायटीचे सेक्रेटरी उत्तम नलावडे ह्यांनी सरस्वती व मराठी भाषेतील ग्रंथ पुजनाने केली. सोसायटीचे कमिटी सदस्य संजय पाटील यांनी मराठी भाषा गौरव दिनाचा इतिहास व महत्व सांगुन काव्यमैफिलीस प्रारंभ झाला.

कार्यक्रमाची संकल्पना, आयोजन व सूत्रसंचलन विद्या जोशी यांनी केले. सोसायटीतील अतुल सावळे-पाटील यांनी आजच्या काळात मराठी भाषा टिकवणे किती आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले. सोसायटीचे चेअरमन योगेश सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

मराठी पाऊल पडते पुढे….
कार्यक्रमामध्येे सर्वच वयोगटातील काव्यप्रेमींनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सर्वांमध्ये लहानग्या मुला-मुलींचा सहभाग व सादरीकरण वाखाणण्याजोगी होती. झाडे, पाऊस, नदी, समुद्र, प्राणी, पक्षी, प्रेम, वात्सल्य, माणुसकी, भाषेेचा अभिमान, शौर्य, पराक्रम अशा विविध विषयास अनुसरून अनेक कवींनी लिहिलेले काव्य डीएसके कुंजबन परिसरात गुंंजत होते. हे गुजंन मराठी पाऊल पडते पुढे यांनी आठवण मनामनात ठासवतही होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button