मराठा आरक्षणासाठी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनाची हाक
मुंबईतील आंदोलनापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन उभारलं, त्यांनी अनेकदा उपोषण देखील केलं. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यासाठी आता त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात पुन्हा एकदा मराठा बांधव एकत्र येणार आहेत. 29 ऑगस्टपासून मराठा बांधवांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर सुरुवात होणार आहे, त्यापूर्वीच 28 ऑगस्टला लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे.
हे आंदोलन गेल्या आंदोलनापेक्षा पाच पट मोठं असेल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक गावांना भेटी देखील दिल्या आहेत. अनेक दौरे केले. त्यानंतर आता 29 ऑगस्टपासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सरकारने मराठा उपसमितीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : स्वतंत्र अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयासाठी पाठपुरावा
मराठा उपसमितीचे अध्यक्ष बदलण्यात आले आहेत, पूर्वी चंद्रकांत पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते, आता राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत. सरकारकडून मराठा उपसमितीचं पुर्नगठण करण्यात आलं आहे. पूर्वी अध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे आता या समितीमध्ये सदस्य असणार आहेत. या समितीमध्ये एकूण 12 सदसस्य आहेत.
ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आता मराठा उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत, तर चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे, भोसले, कोकाटे, मकरंद जाधव आणि बाबासाहेब पाटील हे सर्व मराठा उपसमितीचे सदस्य असणार आहेत. ही समिती मराठा समाजाच्या शौक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबतचा आढावा घेत राहणार आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाआधीच सरकारकडून मराठा उपसमितीचं पुर्नगठण करण्यात आलं आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाला सुरुवात होणार आहे, मात्र त्यापूर्वीच मोठा निर्णय घेण्यात आला आहे.




