breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं घर पेटवलं

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राज्यभरतील मराठा समाजही आक्रमक झाला असून अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दरम्यान, मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली आहे. एवढंच नव्हे तर आंदोलकांनी वाहनांना आगही लावली आहे.

आमदार प्रकाश सोळंके हे मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावर काहीच बोलले नाहीत, हा राग मनात धरून ३००-४०० मराठा आंदोलकांनी त्यांच्या घरावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. आंदोलकांनी सोळंके यांच्या घरावर प्रचंड दगडफेक केली आहे. तसेच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून सर्व वाहनं जाळली आहेत.

हेही वाचा – महापालिका नोकर भरती: पात्र उमेदवारांना तात्काळ रुजू करा!

दरम्यान, यावरून आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा मी माझ्या घरात होतो. सुदैवाने माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य किंवा कर्मचारी जखमी झाले नाहीत. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. आगीमुळे मालमत्तेचे मोठं नुकसान झालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button