breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

विनेश फोगटच्या अपात्रतेवर केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय? केंद्रीय क्रीडामंत्री म्हणाले..

Mansukh Mandaviya | भारतीय कुस्तीपटू विनेश फोगच कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात अपात्र ठरल्यानंतर जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विनेश फोगटच वजन ५० किलोपेक्षा फक्त १०० ग्रॅम जास्त असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर भारत सरकारची भूमिका काय? याबाबत केंद्रीय क्रीडमंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेमध्ये सविस्तर निवेदन केलं आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय म्हणाले, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट वजन जास्त भरल्यामुळे ऑलिम्पिकच्या ५० किलो वजनी गटातून अपात्र झाली आहे. १०० ग्रॅम वजन जास्त झा’ल्यामुळे तिला अपात्र करण्यात आलं आहे. विनेश या गटात खेळत असल्यामुळे तिचं वजन ५० किलो किंवा त्यापेक्षा कमी असणं अपेक्षित होतं. पण ते जास्त भरल्यामुळए युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अर्थात UWW च्या नियमांनुसार विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आलं आहे. तिथे दररोज सकाळी खेळाडूंच्या वजनाची मोजणी केली जाते.

हेही वाचा      –      ‘आमदारांच्या गाड्या फोडणे हा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न’; प्रकाश आंबेडकरांचा आरोप 

७ ऑगस्ट २०२४ रोजी कुस्तीपटूंचं वजन मोजण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी विनेश फोगटचं वजन ५० किलो १०० ग्रॅम भरलं. त्यामुळे विनेशला अंतिम सामना खेळण्यासाठी अपात्र घोषित करण्यात आलं. ७ ऑगस्ट २०२४ ला ५० किलो वजनी गटातील वजनाची मोजणी ७ वाजून १५ मिनीट व ७ वाजून ३० मिनिटांनी करण्यात आली. विनेशचं वजन ५० किलो १०० ग्रॅम आलं. त्यामुळे तिला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आलं. यासंदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघानं आंतरराष्ट्रीय कुस्ती महसंघाकडे कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पी. टी. उषाही पॅरीसमध्येच आहेत. पंतप्रधानांनी स्वत: त्यांच्याशी बोलून योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं आहे, असं मनसुख मांडवीय म्हणाले.

विनेश मंगळवारी ६ ऑगस्टला ३ सामने खेळून ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. सेमीफायनलमध्ये तिने क्युबाच्या कुस्तीपटूला पराभूत केलं होतं. विनेश फोगटला बुधवारी ७ ऑगस्टला रात्री १० च्या सुमारास सुवर्ण पदकासाठी अमेरिकेच्या कुस्तीपटूशी सामना करायचा होता, अशी माहिती मनसुख मांडवीय यांनी दिली.

विनेश फोगटच्या तयारीसाठीच्या मदतीचा मुद्दा घेतल्यास, भारत सरकारने विनेश फोगटला जे जे हवं होतं, ती सर्व मदत दिली आहे. विनेश फोगटला वैयक्तिक कर्मचारीही देण्यात आले आहेत. विनेशसोबत हंगेरीचे प्रसिद्ध प्रशिक्षक होलेर अपोस व फिजिओ अश्विनी पाटील नेहमी असतात. या कर्मचाऱ्यांसाठी विशेष आर्थिक तरतूदही करण्यात आली होती. पॅरिस ऑलिम्पिकसाठी विनेश फोगटच्या तयारीसाठी व सपोर्ट स्टाफसाठी ७० लाख ४५ हजार ७७५ रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, असंही मनसुख मांडवीय म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button