breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘ओबीसी समाजाची बैठक ‘मॅनज’ होती’; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ओबीसी नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने घेतलेली बैठक ही पूर्णपणे मॅनेज केलेली बैठक. जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, कुणबी प्रमाणपत्रांची चौकशी होणार असेल तर मंडल आयोगाने दिलेलं १४ टक्के आरक्षणही घालवलं पाहिजे. वरचं तर बोगस आहेच. त्यात काही दुमत नाही. मराठे त्याबद्दल गप्प आहे. त्याच्यावरचं १६ टक्के आरक्षण बोगस असतं, सरकार एका बाजूने बोलणारं नसेल तर दूध का दूध आणि पानी का पानी केलं जाईल. श्वेतपत्रिका काढतील त्याचीही. १४ टक्क्यांचं १६ टक्के आणि त्यानंतर ५२ टक्के कसं झालं? १४ टक्के आरक्षणही रद्द करा हीपण आमची मागणी आहे.

मंडल आयोगाने आरक्षण दिलं तेव्हा सर्व्हे, जातनिहाय जनगणना सगळं केलं असेल. ओबीसींची यादीही तयार असेल. जनगणना त्यांनी स्वतः केली की इंग्रजांची घेतली. जर खोटं असेल तर ते १४ टक्के आरक्षणही रद्द झालं पाहिजे. इंग्रजांची जनगणना खरी आणि आमची १८८४ च्या मराठ्यांच्या नोंदी खोट्या असं कसं चालेल? असं जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा     –      पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० वर्षांचा तुरूंगवास आणि १ कोटींचा दंड होणार 

बाकीच्या संस्थांना फायदा मिळतोय तसं सारथीतून सगळ्यांना फायदा मिळाला हे आम्हीही सांगितलं. छगन भुजबळचं काय बोलायचं? तो काहीही रद्द करा म्हणतोय. त्याने सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर घातल्या आहेत. तो म्हणतोय रद्द करा हा जातीयवाद नाही का? सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणीत ओबीसी बांधवांचाही फायदा होणार आहे. ते तो रद्द करा म्हणतोय. याची मागणीच अशी असते ज्यात काही तथ्य नसतं. मराठ्यांचं वाटोळं होईल अशी त्याची (छगन भुजबळ) एक तरी मागणी असतेच. मराठ्यांच्या मागण्यांना विरोध करायचा हा भुजबळांचा धंदाच झाला आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

लक्ष्मण हाके आत्ता सगळ्यांचा आदर करत आहेत, मी १० महिन्यांपासून आदरच करतो आहे. मी सगळ्यांचा सन्मानच राखला आहे. मी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून भांडतोय आणि तुम्ही मिळू नये म्हणून भांडत आहात. ब्र शब्दाने मी कुणाला दुखावलं नाही. त्या एकट्याला (भुजबळ) सोडून. जातीयवाद होऊ नये यासाठी एकत्र बसायचं जर सरकार आणि ओबीसींमध्ये ठरलं असेल तर आम्हीही तयार आहोत. आम्हाला कुठे जातीयवाद करायचा आहे? असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button