breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मनोज जरांगेंचा फडणवीस, महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले..

Manoj Jarange Patil | महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार आमच्याबरोबर राजकारण करत आहे. आमच्या हक्काचं आरक्षण द्यायला टाळाटाळ करत आहे. हे सरकार मराठा समाजातील केवळ पाच-दहा लोकांना, ओबीसींमधील पाच-दहा लोकांना मोठं करू पाहतंय आणि उर्वरित समाजाकडे दुर्लक्ष करतंय, असं म्हणज मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नांदेडमधील सभेत बोलत होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना वाटतंय की मी मराठ्यांच्या काही नेत्यांना मोठं करेन, जातीकडे दुर्लक्ष करेन आणि कोणी काही बोलणार नाही. परंतु, त्यांना एक गोष्ट समजत नाहीये की समाजबांधव आता त्यांचं ऐकणार नाहीत. मराठ्यांनी त्यांना आता सांगितलंय तुम्ही नेत्यांना मोठं करा आणि त्यांनाच घेऊन फिरा, आम्ही तुम्हाला योग्य वेळी उत्तर देऊ. मी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा सांगू इच्छितो, तुम्ही आमचे शत्रू नाही, आम्हाला केवळ आमच्या हक्काचं आरक्षण द्या.

हेही वाचा     –      सातारा व पुणे जिल्ह्याला आज पावसाचा ‘रेड अलर्ट’

मराठा समाजासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणाले, मला पद नको, पैसे नको, मला फक्त माझ्या जातीला आरक्षण मिळवून द्यायचं आहे. माझी धडपड माझ्या जातीतील लोकांना दिसतेय म्हणून ते आता मला एकटं पडू देत नाहीत. मी देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, अनेक वेळा मी हा प्रयत्न केलाय, आज पुन्हा एकदा करतो. फडणवीसजी तुम्ही आमचे शत्रू नाही, आम्ही तुम्हाला विरोधक मानत नाही, तुम्ही केवळ आम्हाला आमचं ठरलेलं आरक्षण द्या, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, कारण कुणबी आणि मराठा एकच आहेत. आम्हाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या, त्यासंबंधीचं गॅझेट लागू करा. असं केल्यास आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू, मात्र तुम्ही हे न करता काड्या करत बसता, असं मनोज जरांगे म्हणाले.

तुमचे ते गिरीश महाजन, छगन भुजबळ चंद्रकांत पाटील, या लोकांना आरक्षणातलं काहीच कळत नाही. मराठ्यांची दोन-चार माकडं तुमच्याबरोबर असतात, ते मंत्रिपदासाठी तुमचं ऐकतात. मराठ्यांचं काहीही होऊ देत त्यांना काही फरक पडत नाही. तुमची ती चार माकडं मला सांगतात, आमच्या साहेबांना काही बोलायचं नाही. मी जे काय बोलतोय ते ऐकत असाल तर ऐका, मराठा समाजात सरकारविरोधात रोष पसरू लागला आहे. तुमचे चार लोक तुमच्या बाजूने बोलतात, कारण त्यांना निवडणुकीचं तिकीट पाहिजे, मंत्रिपद पाहिजे. मला तिकीट, मंत्रिपद, पैसे यातलं काहीच नको. मला केवळ माझ्या जातीला आरक्षण मिळवून द्यायचं आहे म्हणून मी त्यांच्या विरोधात आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button