ताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय

इंदिरा गांधींची देशात आणीबाणी, मोदी सरकारने कॉंग्रेसला घेरले

दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. 2024 च्या निवडणुकीत काँगेसने संविधान बचाव असा प्रचार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला टीकेचे लक्ष्य केले होते. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला धक्का देणारा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर केली होती. यावरून मोदी सरकारने कॉंग्रेसला घेरले आहे. केंद्र सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.

इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. 26 जून 1975 ते 21 जून 1977 अशी 21 महिने देशात आणीबाणी लागू होती. हजारो लोकांना जेलमध्ये टाकण्यात आले होते. या काळात लोकसभा निवडणुकाही स्थगित करण्यात आल्या होत्या. या काळात सरकारविरोधातील जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी सारख्या नेत्यांनाही तुरुंगात डांबण्यात आले होते. वृत्तपत्रांवर सरकारविरोधात मजकूर प्रकाशित करण्यास बंधने घालण्यात आली होती. इंदिरा गांधी यांनी लादलेली ही आणीबाणी लोकशाहीच्या भारताच्या संविधानाची हत्या असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने भाजप विरोधात प्रचार करताना संविधान बदलण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यामुळे इंडिया आघाडी आणि काँग्रेसला गेल्या दोन लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक यश मिळाले. तर, भाजपचे संख्याबळ घटले. लोकसभेत राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले. राहुल गांधी यांनी सदस्यत्वाची शपथ घेताना संविधानाची प्रत हाती घेऊन शपथ घेतली होती. मात्र, त्यांच्या या आरोपांना केंद्र सरकारने मोठा निर्णय घेऊन एक प्रकारे उत्तरच दिले आहे.

केंद्र सरकारने एक अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर ही अधिसूचना पोस्ट केली आहे. 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवून देशात आणीबाणी लादली. त्यांनी भारतीय लोकशाहीचा गळा घोटला. त्यामुळे भारत सरकारने 25 जून हा दिवस दरवर्षी ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल असेही अमित शहा यांनी आपल्या पोष्टमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button