Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर!
![Local Body Elections: Local body elections postponed again!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Local-Body-Elections-780x470.jpg)
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण पुन्हा लांबणीवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी झाली नाही. महाराष्ट्र सरकारने काही वेळ मागितला त्यानंतर प्रकरण ३ आठवड्यासाठी लांबणीवर ठेवण्यात आले. राज्यात पुणेसह २५ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषद, २०७ नगरपालिका निवडणुका पुन्हा अधांतरी राहिल्या आहेत.
29 मार्च 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयात हे संपूर्ण प्रकरण मेन्शन करण्यात आलं होतं. पण त्यावेळी सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा नवी तारीख देण्यात आली होती. त्यानुसार आज हे प्रकरण सुनावणीसाठी मेन्शन करण्यात आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात गेली आठ महिने ‘तारीख पे तारीख’ सुरु आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्यानं तारखा दिल्या जात आहेत. 29 मार्चपूर्वी 28 मार्च रोजी याबाबत सुनावणीची तारीख होती, पण घटनापिठाच्या कामकाजामुळे सुनावणी होऊ शकली नाही.
29 मार्च रोजी सकाळी याचिकाकर्त्यांच्या वकीलांकडून साडेदहा वाजता मेन्शनिंग करतील त्यानंतर एका नव्या तारखेची मागणी करण्यात आली. 92 नगरपरिषदांमध्येही ओबीसी आरक्षण लागू व्हावं, बदललेल्या वॉर्ड रचनेला दिलेलं आव्हान या गोष्टी कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या असल्यानं निवडणुका खोळंबल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाला मंजुरी दिलेली आहे, 92 नगरपरिषदांसाठी केवळ निवडणूक आयोगाला आदेश द्यायचं काम बाकी आहे, असं गेल्या वेळी वकीलांनी कोर्टात सांगितलं होतं.