breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

‘जाती-पातीवरून द्वेष पसरवणाऱ्यांना दूर ठेवा’; राज ठाकरे

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आमची बैठक होती. त्याबाबत नेत्यांना आदेश देण्यात आले आहेत. सध्या समाजात जातीचं विष पसरवलं जात आहे. जाती-पातीतून काहीही होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

जातीपातीच्या नावावर राजकीय नेते द्वेष पसरवतील अन् मतं मागतील आणि भोळसटपणे हे लोक मत देतील. पण, पुढच्या येणाऱ्या पिढ्या यांच्या मनामध्ये जात विषय भिनत आहे. शाळा-कॉलेजपर्यंत हा विषय गेला आहे. लहान मुलं जाती विषयी बोलत आहेत. जातीपातीवरून जे द्वेश पसरवणारे नेते आहेत. त्यांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे, असं राज म्हणाले.

हेही वाचा    –      ‘बदल हा श्रुष्टीचा नियम असून तो स्विकारला तरच प्रगती’; परशुराम पाटील

आवडता पक्ष असो किंवा आवडता व्यक्ती असो, पण अशा प्रकारचा द्वेष पसरवला जाणार असेल तर महाराष्ट्राचं काय होईल. उत्तर प्रदेश- बिहारमध्ये जे सुरु आहे. ते उद्या राज्यात सुरु होईल. खून-खराबे सुरू होतील, अशी भीती राज यांनी व्यक्त केली. जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरु होईल, असं राज यांनी सांगितलं.

कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही निवडणुकीत प्रचार कराल असा प्रश्न राज ठाकरे यांना एका पत्रकाराने विचारला होता. यावर राज ठाकरे यांनी आपल्या भाषेत फिरकी घेतली. मी विधानसभेच्या निवडणुकीत युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाच्या मुद्द्यावर प्रचार करणार आहे अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. राज्याच्या निवडणुका आहेत मग राज्याच्याच मुद्द्यांवर प्रचार करणार ना, असं राज यांनी म्हटलं.

जातीपातीच्या मुद्द्यावरून काही लोकांना फायदा होत आहे. हे त्यांना आता कळलं आहे. विकासाचा मुद्दा सोडून जातीपातीवरून वातावरण तयार करणं आणि समाजात तेढ निर्माण करणं हे काम आता ते करत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button