kasba-Chinchwad By Poll Election : नाना काटेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची तोफ धडाडणार?
![kasba-Chinchwad By Poll Election list of 20 star campaigners announced by NCP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/nana-kate-1-780x470.jpg)
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने २० स्टार प्रचारकांची नावे जाहिर
पिंपरी : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राज्याचे राजकारण तापले आहे. निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू झाला आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने २० स्टार प्रचारकांची नावे प्रदेश समितीच्यावतीने जाहिर केली आहेत. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्थानिक नेत्याचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार फौजिया खान, माजी मंत्री जितेंद्र अव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार वंदना चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री शशीकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, आमदार निलेश लंके, आमदार अमोल मिटकरी, सुभान अली शेख या नेत्याचा यामध्ये समावेश आहे.
चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा उद्या १० फेब्रुवारी हा दिवस आहे.