breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

कसबा, चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध नाही? काँग्रेस आणि राष्ट्रवादीही रिंगणात

पोटनिवडणुक जाहीर होताच काँग्रेसची तयारी सुरू

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या मतदारसंघांमध्ये तत्काळ प्रभावाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र ही पोटनिवडणुक निवडणुक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुक जाहीर होताच काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.

कसबा पेठ मतदार संघातून मुक्ता टिळक यांच्या घरातून कोणीही इच्छूक नसल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपकडून इथून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने आणि माजी नगरसेवक गणेश बिडकर यांची नावे चर्चेत आहेत. तर काही दिवसांपूर्वीच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे या लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे त्यांनीच जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्वाचे निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिंचवडमधून दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा आहे. तर चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरू आहे. शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा करणार आहेत.

या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ रोजी होईल. शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर सोमवार २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होईल. गुरुवार २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती प्र. उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button