breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘या’ विद्यमान खासदाराला भाजपाकडून तिकीट

मुंबई | भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ७० नावं आहेत. महाराष्ट्रातल्या २० जणांची नावं या यादीत आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या विद्यमान खासदाराला भाजपाकडून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

भाजपाने दादरा व नगर हवेलीचे खासदार कलाबेन डेलकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कलाबेन डेलकर यांचे पती खासदार मोहन डेलकर यांचा २०२१ मध्ये मुंबईत संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने महेश गावित यांना तिकीट दिलं होते. तर शिवनेसा ठाकरे गटाने कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती. या निवडणूकीत कलाबेन डेलकर या विजयी झाल्या होत्या.

हेही वाचा      –    ‘महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण’; संजय राऊतांचा विधान 

कलाबेन डेलकर आत्तापर्यंत उद्धव ठाकरे गटासोबत असल्याचं सांगितलं जात होतं. पण त्यांच्या भाजपा पक्षप्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा कार्यक्रमही न करता भाजपानं थेट यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकारामुळे उद्धव ठाकरे गटाला धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्र भाजपा उमेदवारांची यादी

हिना गावित – नंदुरबार, सुभाष भामरे – धुळे, स्मिता वाघ – जळगाव, रक्षा खडसे – रावेर, अनुप धोत्रे – अकोला, रामदास तडस – वर्धा, नितीन गडकरी – नागपूर, सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, प्रतापराव चिखलीकर – नांदेड, रावसाहेब दानवे – जालना, भारती पवाण – दिंडोरी, कपिल पाटील – भिवंडी, पियूष गोयल – उत्तर मुंबई, मिहिर कोटेचा – मुंबई उत्तर पूर्व, मुरलीधर मोहोळ – पुणे, सुजय विखे पाटील – अहमदनगर, पंकजा मुंडे – बीड, सुधाकर श्रृंगारे – लातूर, रणजीत सिंह नाईक निंबाळकर – माढा, संजयकाका पाटील – सांगली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button